आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकुमार यांना लागली होती मृत्यूची चाहूल, बघा RARE PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते राज कुमार यांची आज (बुधवारी) सतरावी पुण्यतिथी आहे. पैगाम, वक्त, नीलकमल, पाकीजा, मर्यादा, हीर रांझा, सौदागर यांसारखे अविस्मरणीय सिनेमे देणारे राज कुमार यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडली.
एकांतवासात आपले आयुष्य व्यतित करणारे राज कुमार यांना त्यांच्या मृत्यूची चाहूल लागली होती. म्हणूनच त्यांनी त्यांचे पुत्र पुरु राज कुमार यांना आपल्या जवळ बोलवून सांगितले होते की, ''जीवन आणि मृत्यू माणसाची खासगी गोष्ट असते. त्यामुळे माझ्या मृत्यूबद्दल केवळ माझा जवळचा मित्र चेतन आनंद यालाच माहिती देशील. इतर कुणाला त्याबद्दल सांगू नकोस. माझ्या अंत्यसंस्कारानंतर फिल्म इंडस्ट्रीला याची माहिती दे.''
3 जुलै 1999 रोजी राज कुमार यांनी या जगाचा निरोप घेतला.
बघा राजकुमार यांची दुर्मिळ छायाचित्रे...