बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषालने 12 मार्च रोजी आपला 30 वा वाढदिवस साजरा केला. 12 मार्च 1984 रोजी श्रेयाचा जन्म पश्चिम बंगालमधील एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. श्रेयाने राष्ट्रीय आणि फिल्मफेअर पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. याशिवाय अनेक अवॉर्ड्स तिने आपल्या नावी केले आहेत.
'देवदास'द्वारे सुरु झाले बॉलिवूड करिअर...
संजय लीला भन्साळी यांनी श्रेयाला पहिल्यांदा पार्श्वगायनाची संधी दिली. 'देवदास' या सिनेमातील पाच गाणी श्रेयाने स्वरबद्ध केली होती. 'सिलसिला ये चाहत का..', 'बैरी पिया...' , 'छलक-छलक...', 'मोरे पिया...' आणि 'दिल डोला रे...' या गाण्यांना श्रेयाने आपला आवाज दिला होता. यापैकी बैरी पिया... हे गाणे त्यावेळी टॉप चार्टमध्ये होते. यानंतर तिने जहर, परिणीती, रब ने बना दी जोडी, एक विवाह ऐसा भी या सिनेमांसह अनेक सिनेमांत गाणी गायली.
श्रेया घोषाल डे...
अमेरिकेत एक दिवस श्रेयाच्या नावाने साजरा केला जातो. अमेरिकेतील ऑहियो राज्यातील गव्हर्नरने 26 जून हा दिवस श्रेयाला समर्पित करुन हा दिवस श्रेया घोषाल डे नावाने साजरा करण्याचे जाहिर केले. 2010मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी रेडियो स्टेशनवर श्रेयाची गाणी वाजवली जातात. शिवाय सोशल नेटवर्किंग साइट्सवर तिचे जास्तीत जास्त फोटो अपलोड केले जातात.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला श्रेयाची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत. श्रेयाची ही छायाचित्रे कदाचित तुम्ही बघितली असावीत...