आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकेकाळी एवढी GLAMOROUS होती रणबीरची मम्मी, बघा UNSEEN अवतार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेते ऋषी कपूर यांची पत्नी आणि रणबीर कपूरची आई नीतू सिंग यांचा आज (8 जुलै) वाढदिवस आहे. नीतू सिंग यांनी बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिल्लीतील एका शीख कुटुंबात 8 जुलै 1958 रोजी नीतू यांचा जन्म झाला होता. नीतू यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1972 साली रिलीज झालेल्या 'रिक्शावाला' या सिनेमाद्वारे केली होती.
नीतू यांनी ऑन स्क्रिन जोडी ऋषी कपूर यांच्याबरोबर जमली होती. 1975 साली रिलीज झालेल्या 'खेल खेल में' या सिनेमात नीतू आणि ऋषी पहिल्यांदा एकत्र झळकले होते. या जोडीने तब्बल अकरा सिनेमात एकत्र काम केले. ऑन स्क्रिनवरची ही हिट जोडी ख-या आयुष्यात एकत्र आली. 1979 साली हे दोघे लग्नगाठीत अडकले.
नीतू सिंग यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांची काही जुनी छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये नीतू सिंग यांचा ग्लॅमरस लूक बघायला मिळतोय.