आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Updete News Amitabh Bachhan Will Get Life Time Achievement Award Indore Madhya Pradesh

अमिताभ यांना मिळणार लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड, बघा पहिली झलक...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चनला इंदोर मॅनेजमेंट असोसिएशनच्या 23व्यां इंटरनॅशल मॅनेजमेंट कॉन्क्लेव-2014मध्ये लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. या कॉन्क्लेवमध्ये सामील होण्यासाठी अमिताभ बच्चन मुंबईवरून इंदोरला 12.45 वाजता पोहचले आहे. एअरपोर्टवरून ते सरळ सभास्थळाकडे गेले. सभास्थाळामध्ये गेल्यानंतर त्यांचे सर्व लोकांनी प्रेमाने स्वागत केले. सोबतच व्यसपीठाच्या जवळ बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून अमिताभ यांचे अभिनंदन केले. अमिताभ यांनीसुध्दा हात हलवून सर्वाचे अभिवादन स्वीकार केले.
आईएमएच्या वतीने खेळ प्रशाळमध्ये आयोजित या दोन दिवसीय कॉन्क्लेवमध्ये देशातील वरिष्ठ अधिकारी सामील होत आहे. शुक्रवारी डॉ. रामचरण यांना आईएमए लाइफ टाइम आउटस्टेंडिंग अचीव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. कॉन्क्लेवचे सचिव अमित बिदासरियाने सांगितले, या कार्यक्रमाच्या व्याख्यानाचा विषय 'लीडरशिप नाउ- वर्क द टॉक' हा ठेवला आहे. यामध्ये सामील होणारे विशेषतज्ञ उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या माध्यमातून यश प्राप्त करण्याचे धडे देणार आहेत. आयोजनात अनुभवी अधिका-यांसोबतच व्यवस्थापनात आत्ताच पदार्पण करणारा तरूणवर्ग सुध्दा सामील होणार आहे.
प्रमुख वक्ते-
गुरूवारी- आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष राजश्री बिर्ला, ब्रिटीश उप-उच्च आयुक्त कुमार अय्यर, हीरो मोटोचे कॉर्पचे संयुक्त एमडी सुनीलकांत मुंजला, ड्यूअल एज्यूकेशन कॉलेजचे डॉ. क्रिश्चियन एंगल, बँक ऑफ बडोदाचे सीएमडी एस मुंदडा, पिनस्ट्रॉमचे सीईओ महेश मूर्ति.
शुक्रवार- शिक्षणतज्ञ डॉ.रामचरण, अपोलो हॉस्पिटलचे एमडी डॉ. प्रीथा रेड्डी, इंटरनेट आणि मोबाईल एसो.चे सल्लागार रक्षित टंडन आणि आर्मी जनरल (सेवानिवृत्त) अता हसनेन. दुपारी 3 वाजेपासून स्वामी अवधेशानंद यांचे व्याख्यान राहिल जे सर्वांसाठी खुले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कॉन्क्लेवच्या संबंधीत असलेले काही छायाचित्रे...