मुंबई - व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने लव्ह बर्ड्स एखाद्या चांगल्या रोमँटिक सिनेमाच्या प्रतीक्षेत होते. आज 'गुंडे' हा एकमेव हिंदी सिनेमा रिलीज झाला आहे. त्यामुळे प्रियांका चोप्रा, रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर यांनी हा व्हॅलेंटाइन डे स्पेशल बनवला आहे.
आता बातमी आहे, की 'गुंडे'चा हीरो अर्जुन कपूर लवकरच '2 स्टेट्स' या सिनेमा आलिया भट्टसह स्क्रिन शेअर करणार आहे. या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान म्हणे आलिया भट्टने अर्जुन कपूरला किस करण्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल सहा वेळा रिटेक घेतले. किसींग सीन परफेक्ट व्हावा, अशी आलियाची इच्छा होती, त्यामुळे तिने सहा रिटेक घेऊन हा सिनेमा परफेक्ट बनवला.
या सिनेमाशी निगडीत एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, ''अहमदाबादच्या आआयएम कॉलेजच्या कँटींगमध्ये बसले असताना हा आलिया आणि अर्जुन अचानक किस करते, असा हा सीन होता. सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक वर्मन पहिल्या टेकमुळेच संतुष्ट दिसत होता. मात्र आलियाने सहा टेकपर्यंत अर्जुनला किस केले.''
एका मुलाखतीत आलियाने सांगितले होते, ''मी माझे काम पूर्ण आत्मविश्वासाने करत असते. एखादा सीन करण्यात मी खूप जीवतोड मेहनत घेत असते.'' कदाचित याच कारणामुळे तिने या किसींग सीनमध्ये जीव ओतला.
तर दुसरीकडे दैनिक भास्कर डॉट कॉमशी बोलताना अर्जुनने या गोष्टीला दुजोरा दिला नाही. मात्र नाकारलेसुद्धा नाही.
अर्जुन कपूरने या मुलाखतीत आणकी काय म्हटले, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...