आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Varun Dhawan Play Important Role In Shriram Raghvan's Dark Thriller

चॉकलेट हीरोची इमेज सोडून डार्क थ्रिलरमध्ये झळकणार वरुण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमातून प्रकाशझोतात आलेला डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन आतापर्यंत चॉकलेटी भूमिका करत आला आहे. आता पहिल्यांदाच तो श्रीराम राघवन यांच्या डार्क थ्रिलरमध्ये थ्रिलर भूमिका करणार आहे. सध्या वरुण आपल्या वडिलाच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या ‘तू मेरा हीरो’ या सिनेमाचे शूटिंग करत आहे.
धवन यांच्या आतापर्यंत आलेल्या सिनेमांप्रमाणेच हा सिनेमा असणार आहे. त्यानंतर तो ‘हम्पटी शर्मा की दुल्हनिया’ मध्ये दिसणार आहे. त्यात त्याची सहअभिनेत्री आलिया भट्ट असणार आहे. दोघांची आपल्या करिअरची सुरुवात करण जोहरच्या सिनेमाने केली हेाती. या सिनेमानंतर श्रीराम यांच्या सिनेमाचा नंबर येणार आहे. मात्र वरुणने हा सिनेमा साईन केला की नाही याविषयी अजून कन्फ्यूजन आहे.