आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुण धवनला एकता कपूरच्या सिनेमाची ऑफर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेविड धवन यांचा मुलगा वरुण धवनने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. आता वरुण आपल्या दुस-या सिनेमाच्या तयारीला लागला आहे. एकता कपूरच्या आगामी सिनेमाची ऑफर वरुणला मिळाली आहे. विशेष म्हणजे एकता कपूरचा हा सिनेमा वरुणचे वडील डेविड धवन दिग्दर्शित करणार आहे.

वरुणने या सिनेमाविषयी सांगितले की, ''आपल्या वडिलांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याचा हा अनुभव खूपच वेगळा ठरणार आहे. सध्या ते त्यांच्या दुस-या प्रजोक्टमध्ये बिझी आहेत. त्यामुळे या सिनेमाचे शुटिंग सुरु व्हायला अद्याप थोडा वेळ आहे.''

वरुणने 19 लायन्स गोल्ड अवॉर्ड्समध्ये पदार्पणातला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावी केला. शिवाय वरुण सामाजिक कार्यातही तत्परतेने सहभागी होत असतो. अनेक चॅरिटी प्रोग्राममध्ये त्याने आपला सहभाग नोंदवला आहे.