आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मै तेरा हीरो'च्या प्रमोशनवेळी स्टार्सनी केली धमाल, बघा खास छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड स्टार वरुण धवन सध्या अभिनेत्री इलियाना डिक्रूज आणि नर्गिस फाखरीसोबत त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'मै तेरा हीरो' सिनेमा हीट करण्यासाठी हे स्टार्स जोरदार तयारी करत आहेत. अलीकडेच हे तिन्ही स्टार्स सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबई ठाणे येथे दिसले. त्यांना बघण्यासाठी हजारो लोकांची गर्दी जमली होती.
प्रमोशनसाठी आलेले सिनेमाच्या मुख्य स्टार्सनी इथे खूप धमाल-मस्ती आणि डान्स केला. सोबतच, अभिनेत्री इलियाना आणि नर्गिस यांनीसुध्दा धमाकेदार डान्स केला.
तिन्ही स्टार्सनी सिनेमाच्या प्रमोशनसोबतच मस्तीसुध्दा केली. वरुण, नर्गिस आणि इलियाना यांनी कॅमे-यासमोर पोझसुद्दा दिल्या. 'मै तेरा हीरो'च्या स्टार्सना बघून त्यांचे चाहते खूप उत्साही झाले होते. वडीलांच्या दिग्दर्शनाअंतर्गत सिनेमात वरुण पहिल्यांदाच करतोय काम 'मै तेरा हीरो' हा रोमँटिक-ड्रामा कॉमेडी सिनेमा असून त्याचे दिग्दर्शन डेविड धनव यांनी केले आहे. वरुण हा डेविड यांचा मुलगा असून तो पहिल्यांदाच वडीलांच्या दिग्दर्शनाअंतर्गत बनवला जाणा-या सिनेमात काम करत आहे. वरुणने 2012मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्टूडेंड ऑफ द इअर' सिनेमामधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती.
सिनेमाचा प्लॉट काय आहे?
सिनेमामध्ये वरुणला इलियानावर प्रेम होते. त्याला तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा असते. त्यादरम्यान त्यांच्या प्रेमात अरुणोदय सिंह हा खलनायक येतो. अरुणोदय हा एक भ्रष्ट पोलिसाची भूमिका वठवणार आहे.
अरुणोदय सिंहलासुध्दा इलियानासोबत लग्न करण्याची इच्छा असते. त्यासाठी तो तिच्यावर दबाव टाकतो. त्यानंतर नर्गिस फाखरीच्या एंट्रीने कहाणीत टि्वस्ट येतो. नर्गिस वरुणवर जिवापाड प्रेम करते अशा भूमिकेत तिला दाखवण्यात आले आहे.
तसे, हा सिनेमा बघणे रंजक असणार आहे. कारण वरुण इलियानासोबत लग्न करतो की नर्गिससोबत याचा गुंता आपल्याला बघायला मिळणार आहे. हा सिनेमा 4 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'मै तेरा हीरो'च्या प्रमोशनसाठी पोहोचलेल्या या स्टार्सची काही खास छायाचित्रे....