आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लीक झालेल्या MMS चे सत्य काय ? वीणाने दिले स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वीणा मलिक सध्या आपल्या आगामी 'जिंदगी 50-50 'या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात वीणाने बरेच बोल्ड आणि टॉपलेस सीन्स दिले आहेत. हा सिनेमा आणि वीणा आणखी एका कारणामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी वीणाचा एक एमएमएस लीक झाला होता. लीक झालेल्या या एमएमएसमुळे सिनेमाला आणि शिवाय वीणाला फुकटाची भरपूर प्रसिद्धी मिळत आहे.

सध्या वीणा या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. यानिमित्ताने मीडियासमोर आल्यानंतर तिला या सेक्स क्लिपविषयी प्रश्न विचारले जात आहेत.

अलीकडेच एका पत्रकार परिषदेत हा एमएमएस खरा होता की खोटा, असा प्रश्न विचारला गेला. त्याचे स्पष्टीकरण देताना वीणाने सांगितले की, ''हा खरा एमएमएस नसून सिनेमातील गाण्याचे एक दृश्य आहे. या गाण्यात हीरो-हिरोईनमधली जवळीक दाखवण्यात आली आहे. शिवाय गाण्यात काही इंटीमेट सीन्स असून त्याची क्लिप एमएमएसच्या रुपात लीक करण्यात आली. हा कुठलाही पब्लिसिटी स्टंट नव्हता. हे एक चांगले गाणे असून रेखा भारद्वाज यांनी त्याला स्वरबद्ध केले आहे.''