आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Veena Malik Participates In Sahara's News Channel Launch ‎

PICS: राजकीय नेत्यांमध्ये वीणा झाली हिट...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोस्टार वीणा मलिकवर आपले राजकारणी नेते फारच फिदा झालेले दिसत आहेत. मुंबईत भाजपसोबत दहीहंडी साजरी केल्यानंतर वीणा सहारा ग्रुपच्या नवीन न्यूज चॅनलच्या लॉन्चिग पार्टीत दिसली. या कार्यक्रमात लालू प्रसाद यादव आणि राम विलास पासवान उपस्थित होते. वीणाला भेटल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता.
लालूंनी वीणाचे गुणगान करीत म्हटले की, "वीणा एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे". पडद्यावर प्रत्येक भूमिका ती खूप छान पार पाडते. तर दुसरीकडे राम विलास पासवान म्हणाले की, 'सहारा ग्रुपची उन्नती पाहून खूप छान वाटत आहे. वीणाच्या येण्यामुळे पार्टीचे ग्लॅमर आणखी वाढले आहे.
सहारा ग्रुपचे हेड सुब्रतो रॉय यांनी या आधीही वीणाला अनेक कार्यक्रमात आमंत्रित केलेले आहे. वीणाने सुब्रतो रॉयचे कौतुक करताना असे म्हटले की, 'मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, सुब्रतो रॉय यांनी मला या कार्यक्रमाला बोलावले. मीडिया आपल्या समाजात महत्वाची भूमिका बजावत असतो, आणि मी खूप लकी आहे की, याक्षेत्राशी मी जोडले गेले आहे.
सुब्रतो रॉय यांनीही वीणाचे कौतुक करताना म्हटले की, ' आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण माझे नवीन न्यूज चॅनल सुरु होत आहे.' वीणा मलिक या चॅनलशी जोडली जात आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. सहारा ग्रुपचे हे चॅनल महाराष्ट आणि गुजरातमध्ये हिंदी भाषेत दाखवले जाणार आहे.
अनु मलिक आणि क्रीडामंत्री अजय माकन या कार्यक्रमाला उपस्थित होते.