आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीणा मलिकने कमर्शिअल सिनेमांपासून घेतला संन्यास, मक्कात केली घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने कमर्शिअल सिनेमांपासून संन्यास घेतल्याची घोषणा केली आहे. याविषयी तिने सांगितले, की आता ती केवळ धार्मिक आणि सामाजिक संदेश देणा-या सिनेमांतच काम करेल. वीणाने ही घोषणा मक्का येथील उमरामध्ये केली.
वीणाने सांगितले, 'मनोरंजन क्षेत्रात आता मी भविष्यात जनकल्याण आणि सामाजिक विकासाशी संबंधित उपक्रमांमध्ये काम करत राहिल. मात्र कोणत्याही मसाला सिनेमात मी झळकणार नाही.'
वीणाने गेल्या वर्षी उद्योजक असद बशीर खान यांच्याशी निकाह केला होता. लग्नानंतर ती आपल्या पती आणि सासूसह मक्का येथे गेली होती. (वरील छायाचित्रात वीणा तिचे पती आणि सासूसह दिसत आहे.)
अलीकडेच वीणा एका टीव्ही शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये तिने म्हटले होते, की मौलाना तारिक जमील यांच्याशी भेट झाल्यापासून तिने आयुष्य जगण्याची पद्धत बदलून टाकली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या वीणा मलिकविषयी बरंच काही...