आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजहून परतल्यानंतर अचानक बदलली पडद्यावरची 'सिल्क', पाहा बुरख्यातील वीणाचे PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी वंशाची अभिनेत्री वीणा मलिकच्या करिअरवर एक नजर टाकली असता, तिला पाकिस्तानपेक्षा भारतातच जास्त यश, प्रसिद्धी आणि पैसा मिळाला आहे. भारतीय टीव्ही रिअॅलिटी शोपासून ते बॉलिवूड सिनेमांपर्यंत वीणाने प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र अलीकडेच तिने घेतलेल्या एका निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
डिसेंबर 2013मध्ये वीणाने पाकिस्तानी वंशाच्या दुबई स्थित व्यावसायिकाशी लग्न थाटले. लग्नानंतर तिने कमर्शिअल सिनेमांपासून संन्यास घेतल्याची घोषणा केली. आता सिनेमांमध्ये अंगप्रदर्शन न करण्याचा तिने निर्णय घेतला आहे.
रंजक गोष्ट म्हणजे, वीणाने ही घोषणा हजहून परतल्यानंतर केली. लग्नानंतर वीणा आपल्या पती आणि सासूसह हजला गेली होती. तिथे तिची भेट अनेक मौलवी आणि धर्मगुरुंशी झाली होती. हजहून आल्यानंतर तिने आपल्या करिअरमधला घेतलेला मोठा निर्णय उघड केला.
खरं तर वीणा मलिक आपल्या बोल्ड कृत्यांमुळे आणि कॅमे-यासमोर सिडक्टिव पोज देण्यासाठी ओळखली जाते. बिग बॉसच्या घरातील अश्मित पटेलसोबतची जवळीक असो, किंवा एफएचएम मॅगझिनसाठी केलेल न्यूड फोटोशूट असो तिने लाइमलाइटमध्ये राहण्याची एकही संधी आपल्या हातून गमावली नाही. याशिवाय सिल्क स्मिताची भूमिका साकारुन तिने बरेच अंगप्रदर्शन केले होते. असो, वीणाने घेतलेल्या निर्णयामुळे तिचे चाहते नक्कीच हैराण झाले आहेत.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला वीणाची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत. ही सर्व छायाचित्रे तिने हजहून परतल्यानंतर काढली आहेत. यामध्ये ती आपल्या पतीसह दिसत आहे. शिवाय प्रत्येक छायाचित्रात तिने बुरखा घातलेला दिसतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा लग्नानंतर किती बदलली आहे वीणा मलिक...