आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Veteran Actor Farooq Sheikh Passes Away Due To Heart Attack

फारुख शेख कायम स्मरणात राहतील असे काही HIT CINEMAS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध अभिनेता फारुख शेख यांचे हृदय झटक्याने दुबईमधील हॉस्पीटलमध्ये शनिवारी सकाळी 8 वाजता निधन झाले. आताच्या 'ये जवानी है दिवानी' आणि 'शांघाई' या सिनेमामध्ये त्यांनी अभिनय केला होता. आता सध्या ते 'क्लब 60'मध्ये काम करत होते. 25 मार्च 1948 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी 1973 मध्ये अभिनयाला सुरूवात केली होती. हो सिनेमा हिट झाला होता. त्यानंतर त्यांनी 1977मध्ये 'शतरंग के खिलाडी' 1979 'नुरी', 1981 'चश्मे बहाद्दूर', 1983मध्ये 'किसी से ना कहना' या सिनेमांत उत्कृष्ट अभिनय केला.
90च्या दशकात त्यांनी सिनेमात काम करणं कमी केलं होतं आणि टीव्हीवरील मालिकांकडे त्यांनी कल वाढवला होता. त्यांनी सोनी चॅनलवरील 'चमत्कार' आणि 'स्टार प्लस' चॅनलवर 'जी मंत्रीजी' सारख्या मालिकांमध्ये अभिनय केला होता. यापूर्वी त्यांनी 1985 ते 1986च्या दरम्यान 'श्रीकांत' नावाचच्या मालिकेत काम केलं होतं. याचबरोबर त्यांनी 'जीना इसी का नाम है' या मालिकेच्या होस्टचा अभिनय केला होता. यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांच्या प्रसिद्ध व्यक्तीमत्वांच्या मुलाखती घेतल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या त्या सिनेमाविषयी ज्यामुळे फारुख राहतील अमर