आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Viacom 18 Motion Pictures Enters Regional Cinema Space

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'वायकॉम 18 मोशन पिक्चर्स' करणार प्रादेशिक सिनेमांची निर्मिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'वायकॉम 18 मोशन पिक्चर्स' कंपनीने आता प्रादेशिक सिनेमांच्या निर्मितीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच या कंपनीने पाच प्रादेशिक सिनेमांची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे. वायकॉम 18 मोशन पिक्चर्सने आपल्या बॅनरखाली अनेक हिंदी सिनेमांची निर्मिती केली आहे. आता हिंदीनंतर 'वायकॉम 18 मोशन पिक्चर्स' बॅनरचे मराठी, बंगाली, पंजाबी, तामिळ आणि तेलगू या भाषांतील सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

या बॅनरखाली तयार होणा-या सिनेमांमध्ये महेश कोठारे दिग्दर्शित 'झपाटलेला' या सिनेमाचा समावेश आहे. 'झपाटलेला' पहिला मराठी 3D सिनेमा आहे. याशिवाय राजीव पाटील दिग्दर्शित '72 माईल्स' या सिनेमांचा समावेश आहे. शिवाय सुजॉय घोषच्या गाजलेल्या 'कहानी' या सिनेमाचा तामिळ आणि तेलगू रिमेकसुद्धा 'वायकॉम 18 मोशन पिक्चर्स' बॅनरखाली तयार होणार आहे.