आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : विद्या बालन झाली 'मदर इंडिया'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पन्नासच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस दत्त 'मदर इंडिया'च्या रुपात आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. 1957 साली प्रदर्शित झालेल्या महबूब खान यांच्या 'मदर इंडिया' या सिनेमात नर्गिस दत्त यांनी प्रमुख भूमिका साकरली होती. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब मिळाला होता.

भारतीय सिनेसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने अभिनेत्री विद्या बालनने 'सिने ब्लिट्ज' या मॅगझिनसाठी एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये विद्या 'मदर इंडिया'च्या लूकमध्ये दिसत आहे. विद्याला बॉलिवूडमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जाते. आता या नव्या लूकमध्ये विद्याने नर्सिग दत्तच्या आठवणींना उजाळा दिला यात शंका नाही.