आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढलेल्या वजनामुळे झाला विद्याला फायदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नानंतर विद्या बालन पुन्हा कामाला लागली आहे. ती एका बायोपिकमध्ये काम करणार आहे. या सिनेमात ती कर्नाटकच्या प्रसिद्ध क्लासिकल गायिका एमएस सुब्बलक्ष्मीची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक राजीव मेनन आहेत. सध्या विद्या ‘घनचक्कर’च्या चित्रीकरणात मग्न आहे. यानंतर ती फरहान अख्तर यांच्या ‘शादी के साइड इफेक्ट्स’ मध्ये काम करणार आहे. नंतर ती राजीव मेनन यांच्या सिनेमाला वेळ देणार आहे. सुब्बुलक्ष्मीच्या भूमिकेसाठी आधी ऐश्वर्या रायला घेण्याचा विचार सुरू होता. मात्र ऐश्वर्याला आराध्यामुळे वेळ नसल्याने तिने या भूमिकेसाठी आपला होकार कळवला नव्हता. त्यामुळे विद्याला घेण्यात आले. मात्र पात्राच्या मागणीनुसार विद्याच त्या भूमिकेसाठी फिट असल्याची चर्चा आहे. कारण विद्याचे वजन सध्या खूप वाढले आहे. एकुणच काय तर वाढलेल्या वजनाचा विद्याला फायदाच झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.