आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘शादी के साइड इफेक्ट्स’: विद्या होणार स्लिम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री विद्या बालनने 'द डर्टी पिक्चर'साठी जवळजवळ बारा किलो वजन वाढवले होते. त्यानंतर विद्या खूपच लठ्ठ दिसू लागली होती. मात्र आता पुन्हा एकदा विद्याने आपल्या मुळ रुपात परतायचे ठरवले आहे. विद्या सध्या आपले वजन कमी करण्याच्या तयारीला लागली आहे. याविषयी विद्या म्हणते की, मला भूमिकेनुसार स्वतःला बदलायला आवडतं.
विद्या आपल्या आगामी ‘शादी के साइड इफेक्ट्स’ या सिनेमासाठी वजन कमी करत आहे. विद्याने केवळ पाच आठवड्यांमध्ये तब्बल साडे नऊ किलो वजन कमी केले आहे. आता पुढील वीस दिवसांत विद्याला आणखी अडीच किलो वजन कमी करण्याची इच्छा आहे.
एकुणच काय तर विद्याचे चाहते तिला पुन्हा एकदा स्लिम अवतारात बघण्यासाठी उत्सुक असणार हे नक्की.