आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतरही बोल्ड भूमिका करणार विद्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्या बालन आपल्या आगामी सिनेमांमध्ये बोल्ड भूमिकेत दिसणार आहे. इम्रान हाश्मीसोबत तिचा 'घनचक्कर' सिनेमा येत्या 21 जूनला रिलीज होणार आहे. या सिनेमात ती एका पंजाबी गृहिणीच्या भूमिकेत आहे. हा एक विनोदी सिनेमा असून या याचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले आहे. गुप्ता म्हणतात की, विद्याशिवाय हा सिनेमा बनलाच नसता.
इम्रान हाश्मीसोबत कामाचा अनुभव कसा राहिला यावर ती म्हणाली, मी पहिल्यांदाच त्याच्यासोबत काम करत नाही तर याआधीही मी त्याच्यासोबत काम केले आहे. 'डर्टी पिक्चर'मध्ये त्याच्यासोबत काम केले आहे. या सिनेमातही त्याच्यासोबत काम करताना खूप मजा आली.
लग्नानंतरचा विद्याचा हा पहिला सिनेमा आहे. 'इश्किया' आणि 'द डर्टी पिक्चर'मध्ये बोल्ड भूमिका केलेली विद्या लग्नानंतरही बोल्ड भूमिका करेल का ? या प्रश्नावर ती म्हणाली की, 'मी एक अभिनेत्री आहे आणि आताच माझे लग्न झाले आहे. त्यामुळे माझ्या कामावर काही फरक पडणार नाही. सिद्धार्थ आणि मी दोघेही आपापल्या कामाचा सन्मान करतो'. विद्याने डिसेंबरमध्येच यूटीव्हीच्या सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले होते.