आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्या-फरहानच्या सिनेमावर क्रिकेटचे साइड इफेक्ट्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'शादी के साइड इफेक्ट्स'ने अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली आहे. विद्या बालन आणि फरहान अख्तर यांचे मागील सिनेमे पाहून हा सिनेमा खूप कमाई करेल, असे वाटले होते. प्रेक्षकांबरोबरच सिनेमाच्या वितरकांनादेखील या जोडीकडून खूप अपेक्षा होती. मात्र, साकेत चौधरीच्या दिग्दर्शनात बनलेल्या 'शादी के साइड इफेक्ट्स' सिनेमाची ओपनिंग निराशा करणारी ठरली.
मल्टिप्लेक्सचे प्रेक्षकच हा सिनेमा पाहायला जात आहेत. सिंगल स्क्रीनमध्ये व्यवसाय मर्यादित आहे. ट्रेड तज्ज्ञांच्या मते, शुक्रवारी रिलीजच्या दिवशी सिनेमा 6.5 कोटींचा व्यवसाय करेल अशी अपेक्षा होती. मात्र, बातमी लिहेपर्यंत मिळालेल्या आकड्यानुसार पहिल्या दिवशी पूर्ण भारतात फक्त 4.5 कोटींचा व्यवसाय झाला. शुक्रवारी दुपारी दोन ते रात्री 11 वाजेपर्यंतचा वेळ भारत-श्रीलंका सामन्याच्या नावे राहिला. रविवारदेखील भारत-पाकिस्तान सामन्याच्या नावे राहील. त्याचा सिनेमावर प्रभाव पडेल. आठवडाभरातच सिनेमाची कमाई ठरत असते. मात्र, 'शादी के साइड इफेक्ट्स'ला क्रिकेटचे साइड इफेक्ट्स सोसावे लागत आहेत. इतके असूनही टीकाकार सिनेमाचे कौतुक करत आहेत.