आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाहा 'घनचक्कर' विद्याच्या हटके लूकची झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री विद्या बालन आपल्या आगामी सिनेमात पंजाबी कुडी बनून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. एका तामिळ ब्राम्हणच्या पंजाबी पत्नीची भूमिका विद्याने या सिनेमात साकारली आहे. हा सिनेमा आहे 'घनचक्कर'. या सिनेमात विद्याने पंजाबी गृहिणीची भूमिका साकरली असून ती यामध्ये भडक रंगांच्या सलवार कुर्तीमध्ये दिसणार आहे.

लेखक-दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांनी याविषयी सांगितले की, ''विद्याला एका हटके रुपात आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणतोय. त्यासाठी विशेष मेहनत घेतली जात आहे''.

तर विद्याने आपल्या या लूकविषयी सांगितले की, ''या सिनेमात मी प्रीति भाटिया नावाच्या गृहिणीची भूमिका साकारत आहे. ही भूमिका करताना खूप मजा येत आहे. ही एक हट्टी-कट्टी पंजाबी हाऊस वाईफ आहे आणि तिला सगळे काही ठाऊक आहे. व्यायाम केल्यानंतर एक समोसा खायला तिची काहीच हरकत नसते.''

सुबर्न राय चौधरी यांनी विद्यासाठी ड्रेसेस डिझाइन केले आहेत. राजकुमार गुप्ता आपल्या या सिनेमासाठी एक म्युझिक व्हिडिओसुद्धा लवकरच शुट करणार आहेत. विद्याच्या अपोझिट या सिनेमात अभिनेता इम्रान हाश्मी आहे. या प्रमोशनल व्हिडिओत विद्या आणि इम्रान एकत्र झळकणार आहेत. येत्या 21 जुलैला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

पाहा 'घनचक्कर' मधील विद्याच्या हटके लूकची खास झलक...