आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विक्रमादित्यांचा नवा सुपरहीरो इम्रान खान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेता आमिर खान याचा भाचा इमरान हा दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे यांच्या आगामी चित्रपटात सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट हृतिक रोशन ‘क्रिश-3’ सारखा नसल्याचे इमराने सांगितले.

‘उडाण’ या चित्रपटाच्या यशानंतर मोटवाणे यांनी सुपरहिरो कथा असलेल्या चित्रपटाची कथा लिहिली. यात इमरान हा गुजराती तरुणाची भूमिका साकारात आहे. इमरान म्हणाला, हा चित्रपट ‘क्रिश-3’ सारखा नाही. मात्र, एका तरुणाला सुपरहिरोसारखी दिव्य शक्ती असल्याची कथा आहे. तसेच यातील माझी भूमिका ही वेगळ्या पद्धतीची आहे. इमरानने ‘कयामत से कयामत तक’ व जो ‘जिता वही सिकंदर’ या चित्रपटातून बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. यानंतर त्याने 2008 आलेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून सोलो भूमिका केली.

त्याच्यासोबत जेनेलिया डिसुझा दिसली होती. हा चित्रपट तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय झाला होता. त्यानंतर त्याने ‘किडनॅप’, ‘लक’, ‘आय हेट लव्ह स्टोरीज’, ‘झुटा ही सही’, ‘ब्रेक के बाद’, ‘देल्ही बेल्ही’, ‘एक मै और एक तू’ ‘मटरू की बिजली का मंडोला’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्याच्या ‘देल्ही बेल्ही’ चित्रपटातील भूमिकेचे सर्वांनीच कौतुक केले होते. सध्या तो ‘गोरी तेरे प्यार मे’ आणि ‘मिलन टॉकीज’ या चित्रपटात काम करत आहे.

‘वन्स अपॉन’मध्ये गँगस्टर
इमरान ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ या चित्रपटात गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. पूर्णपणे गुन्हेगारी जगतावर आधारित असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा यांच्याही भूमिका आहेत.


मामा आमिरचे मार्गदर्शन
बॉलीवूडमध्ये पदार्पण करताना मामा आमिरने आपल्याला खूप मदत केली. तसेच ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपटांची निवड करताना तो आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असल्याचे इमरानने सांगितले.