आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : असे खलनायक होतील काय ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शोले मधला ‘गब्बर’, कालीचरण मधला ‘लायन’ आणि मि. इंडियामधला ‘मोगम्बो’ ही भारतीय प्रेक्षकांना स्मरणात राहिलेली काही गाजलेली खलनायकाची पात्र. अजीत, अमजदखान, अमरीश पूरी, प्राण, शक्ती कपूर, आणि डॅनी या कलाकारांनी खलनायकाला एक नवी उंची मिळवून दिली. पण सध्या बॉलिवूडमध्ये दमदार खलनायक सापडत नाहीत.

सध्याच्या बॉलिवूड सिनेमांतून खलनायक गायब झाल्याचे चित्र आहेत. एकाही सिनेमात खलनायक दिसत नाही. मात्र एकेवेळी खलनायकाशिवाय सिनेमे बनत नव्हते आणि खलनायकाच्या नावानेच सिनेमागृहात गर्दी जमत होती. 50 च्या दशकात कन्हैयालाल-जीवन, 60 च्या दशकात प्राण-अजित, 70 मध्ये रणजित- प्रेम चोप्रा, 80 मध्ये अमरीश पुरी-डॅनी यांनी आणि 90 च्या दशकात गुलशन ग्रोव्हरने खलनायकाचा काळ चांगला गाजवला. अजूनही लोक या खलनायकांना विसरलेले नाहीत. त्यांचे संवाद आजही आठवली जातात. मात्र आता बॉलिवूडला खलनायकांचा विसर पडलेला दिसतो.