आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवेक चालला पॅटर्निटी लिव्हवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता विवेक ओबेराय पॅटर्निटी लिव्हवर चालला आहे. 2010 मध्ये त्याने प्रियंका अल्वासोबत लग्न केले होते. तो आता लवकरच पप्पा होणार आहे.

या गोड बातमीने विवेक खूप खुश झाला आहे. आपल्याला पत्नीची आणि बाळाची खूप काळजी वाटत असल्याचे तो म्हणतो. पत्नीची काळजी घेण्यासाठी विवेक काही दिवस तिच्यासोबत राहणार आहे. प्रियंका सध्या बंगळुरूमध्ये आहे. विवेकसद्धा लवकरच तेथे जाणार आहे आणि कामाला काही दिवस आराम देणार आहे.

‘साथिया’,‘मस्ती’, ‘ओंकारा’,‘शूटआउट अँट लोखंडवाला’, सारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका करणार्‍या विवेकच्या खात्यात ‘मिशन इस्तंबुल’, ‘प्रिंस’, ‘कुर्बान’, ‘किस्मत लव पैसा दिल्ली’सारखे फ्लॉप सिनेमेसुद्धा आहेत. आपल्या काही यशस्वी सिनेमाने विवेक खुश आहे. तो म्हणतो, मी दहा वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. येथे माझ्या कामाला प्रशंसा मिळाली, मला अनेक पुरस्कारही मिळाले, मी खूप पैसा आणि प्रतिष्ठाही कमवली. ज्या लोकांनी मला काम दिले मी त्यांचा आभारी आहे. माझी कोणाविषयीही तक्रार नाही.

रामगोपाल वर्माच्या ‘कंपनी’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा विवेक म्हणतो, 200 कोटींचे सिनेमे करूनही लोक खुश राहत नाहीत. मात्र मी खूप खुश आहे. मी यश-अपयशाचा जास्त विचार करत नाही. मी जर हाच विचार करत बसलो तर जगू शकणार नाही. विवेक लवकरच ‘जयंतीभाई की लव्ह स्टोरी’ मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा 15 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या सिनेमात विवेक एका गुंडाच्या भूमिकेत आहे. त्याने आपल्या पहिल्या सिनेमातसुद्धा गुंडाची भूमिका केली होती. त्याचा एक राजकीय थ्रिलर ‘जिला गाजियाबाद’ 22 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.