आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवेक ओबरॉयच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवेक ओबरॉय लवकरच बाबा होणार आहे. ही बातमी विवेकचा जवळचा मित्र राज कुंदराने ट्विटरवर ब्रेक केली आहे. राजने ट्विट केले की, ''माझा प्रिय मित्र आणि त्याची पत्नी प्रियांकाला या आनंदाच्या बातमीसाठी आणि पेरेंटहुडसाठी खूप खूप शुभेच्छा.''
अलीकडेच बी टाऊनचे अनेक कपल्स आईवडील झाले आहेत. शिल्पा शेट्टी, सेलिना जेटली, ऐश्वर्या राय बच्चन आणि लारा दत्ता या अभिनेत्री अलीकडच्या काळात आई झाल्या आहेत. आता या यादीत विवेक आणि प्रियांकाही सामील झाले आहेत.
२९ ऑक्टोबर २०१० मध्ये विवेक आणि प्रियांका लग्नगाठीत अडकले होते. प्रियांका आई होणार या बातमीमुळे ओबरॉय कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
हे काय ! एकाच टी-शर्टमध्ये विवेक आणि मल्लिका
विवेक ओबेरॉय आणि मल्लिकाचा 'डिशक्यॅव'मध्ये रोमान्स
सलमान खान आणि विवेक ओबेरॉय पुन्हा एकदा आमने-सामने
विवेक ओबेरॉय बनला बॉलिवूडचा सगळ्यात मोठा डॉन