आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध व्हीजे सोफिया हकचे लंडनमध्ये निधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हीजे आणि चित्रपट अभिनेत्री सोफिया हकचे आज(गुरुवार) लंडनमध्ये निधन झाले. ती कॅन्सरने पिडीत होती. ही बातमी समजतातच ग्लॅमर जगत शोकाकुल झाले आहे. सोशल नेट्वर्किंग साईट ट्विटरच्या माध्यमातून कलाकारांनी सोफियाला श्रद्धांजली वाहिली आहे.

सोफियाने 1990 मध्ये व्हीजे म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. सोफियाने मंगल पांडे, हॅरी पुत्तर, लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

कलाकारांनी केलेले ट्विट
चित्रपट दिग्दर्शक केन घोष - "सोफिया आता आपल्यामध्ये नाही, हे ऐकून खूप दुख झाले. ती एक चांगली व्हीजे होती, देव तिच्या आत्म्याला शांती देवो."

पूजा भट्ट - "खूप वाईट बातमी आहे. सोफिया आता आपल्यामध्ये नाही,सौंदर्याची परी आता दुस-या ग्रहावर गेली."

तेजस्विनी कोल्हापुरे - "सोफियाच्या निधनाची बातमी आत्ताच ऐकली, देव तिच्या आत्म्याला शांती देवो."