आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Waheeda Rehman, Helen, Shammi, Dimple Kapadia Congratulate Asha Parekh

वहिदा, हेलन आणि डिंपल आल्या एकत्र, आशा पारेख झाल्या सन्मानित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने एक काळ गाजवणा-या सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना भारतीय सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानासाठी अलीकडेच सन्मानित करण्यात आले. मुंबईतील वांद्रा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका खास कार्यक्रमात जितेंद्र यांनी आशा पारेख यांचा सन्मान केला. इतर मोठ्या कलाकारांची स्वाक्षरी असलेली शॉल आशाजींना यावेळी भेट म्हणून देण्यात आली.
या कार्यक्रमात वहिदा रेहमान, हेलन, जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया यांनीही हजेरी लावली होती. ब-याच दिवसांनी हे सर्व दिग्गज एकत्र जमले होते. यावेळी आशा पारेख यांनी सर्व कलाकारांना मंचावर येण्याची विनंती केली. यावेळी हेलन म्हणाल्या, की आशाजींना हा सन्मान खूप आधीच मिळायला हवा होता. मात्र आतादेखील उशीर झालेला नाही. मी त्यांच्यासाठी खूप खूश आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या कार्यक्रमाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक...