आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारच्या विरोधात एका तरूणीचा लढा, निवडणुकीच्या काळात येणार सुभाष यांचा 'कांची'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवू़डचे शो मॅन सुभाष घई यांनी त्यांच्या आगामी 'कांची' सिनेमाचा पहिला ट्रेलर लाँच केला आहे. या ट्रेलरमध्ये सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री मिष्ठीला जास्त दाखवण्यात आले आहे. सुभाष घई यांच्या या सिनेमातून मिष्ठी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. घई पूर्ण 5 वर्षांनंतर कोणत्या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. त्यामुळे त्यांना या सिनेमाकडून ब-याच अपेक्षा आहेत.
सिनेमात ऋषि कपूर, मिथून चक्रवर्ती, कार्तिक आर्यन, चंदन रॉय आणि ऋषभ सिन्हासुध्दा दिसणार आहेत. एका दिग्दर्शकाच्या रुपात त्यांचा मागील सिनेमा 'युवराज' होता. त्यामध्ये सलमान खान, कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते. 'कांची' सिनेमाच्या पोस्टरवरसुध्दा सुभाष घई यांनी मिष्ठीचाच चेहरा दाखवला आहे.
मुक्ता आर्ट्सच्या बॅनरखाली बनवला जाणा-या या सिनेमाचे संगीत इस्माइल दरबार यांनी दिले आहे. हा सिनेमा 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार होता. परंतु अनेकदा रिलीजच्या तारखा टाळल्यामुळे शेवटी घई यांनी 25 एप्रिलचा मुहूर्त काढला आहे.
सुभाष घई म्हणाले, की हा एक योगायोग आहे, की 'कांची' निवडणुकीच्या काळात रिलीज होत आहे. यामध्ये सरकार आणि कायद्याच्या अव्यवस्थेच्या विरोधात एक तरूणी लढताना दिसणार आहे. देशात लोकसभा निवडणुका 7 एप्रिलपासून ते 12 मेपर्यंत होणार आहेत. यामध्येच 'कांची' सिनेमा 25 एप्रिलला रिलीज होणार आहे.
काय आहे ट्रेलरमध्ये?
'कांची'चा पहिला ट्रेलर 2 मिनीट 20 सेकंदांचा आहे. हा ट्रेलरही मिष्ठीवरच आधारित आहे. ट्रेलरमध्ये कांची काही शिवीगाळ करतानासुध्दा दिसते. ती सरकार आणि कायदा व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवतानाचे दृश्य ट्रेलरमध्ये दिसते.
'कांची'ची कहाणी
सुभाष घई सांगतात, की त्यांचा 'कांची' सिनेमात भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणा-या एका प्रेरणादायी तरूणीची कहाणी आहे. त्यांनी रविवारी टि्वट केले होते, 'कांची हा भारतातील एका सामान्य तरूणीची कहाणी सांगणारा प्रेरणादायी सिनेमा आहे. एक तरूणी जी कोणताही पाठिंबा नसताना महिलांसाठी स्व:बळावर लढाते.'
सुभाष घई का म्हणाले जाते शो मॅन आणि काय आहे त्याच्या सिनेमाच्या यशाचे रहस्य जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...