आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Haven't Any Control On Us , Dilogue In Dhoom 3

बंदे है हम उसके, हम पे किसका जोर..खटकेबाज संवाद धूम-3 मधील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - चित्तथरारक बाइक स्टंट करणा-या आमिरचा स्टायलिश ‘व्हिलन’ आणि कॅटरिना कैफचे जिम्नॅस्टिक कौशल्य यांचा अनोखा मेळ साधत धूम-3 प्रेक्षकांना थरारक मेजवानी देणार आहे. त्याची झलक दाखवणारे ट्रेलर गुरुवारी जाहीर झाले. बंदे है हम उसके, हम पे किसका जोर..अपने हाथों किस्मत लिखने आज चले हैं हम, असा खटकेबाज संवाद अमिर खानच्या तोंडी आहे.


विविध प्रकारच्या भूमिका करणा-या आमिर खानची या चित्रपटात नकारात्मक व्यक्तिरेखा आहे. अशा प्रकारची भूमिका करण्याची आमिरची ही पहिलीच वेळ आहे. बॅड गायचे भाव फर्स्ट लूकमध्ये स्पष्टपणे दिसून येतात. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही एक वेगळीच पर्वणी ठरणार आहे.


सर्कशीतील जिम्नॅस्टिक अशी भूमिका आमिरने धूम-3 मध्ये साकारली आहे. कॅटरिनाने आतापर्यंत केलेल्या भूमिका बार्बी डॉलच्या पलीकडील नव्हत्या. परंतु धूम-3 मध्ये ती नवीन अवतारात पाहायला मिळणार आहे. तिची पर्सनल ट्रेनर यास्मिन कराचीवालाने कॅटरिनाच्या फिटनेसवर मेहनत घेतली आहे. चित्रपटाचे सर्व चित्रीकरण बहुतांश शिकागोमध्येच झाले आहे. 20 डिसेंबरला प्रदश्रित होणा-या धूम-3 मध्ये अभिषेक बच्चन, उदय चोप्रा यांच्याही भूमिका आहेत.
ज्युनियर बच्चनने नऊ किलो वजन कमी करून तिस-यांदा जय दीक्षित साकारला. जॉन अब्राहम, ह्रतिक रोशन यांनी बॅड बॉयचे पात्र चांगले रंगवले होते. आता यशराजच्या या ब्रँडला आमिर आणखी किती उंचीवर नेतो, याची उत्सुकता या ट्रेलरमुळे वाढली आहे.


अचूकतेसाठी जास्त वेळ
धूम चित्रपटाचा ट्रेडमार्क बनला आहे. त्यामुळे त्या दर्जाचे प्रत्येक अ‍ॅक्शन दृश्य जिवंत करण्यासाठी आमिर खानने चित्रीकरणासाठी जास्तीत जास्त वेळ देण्यावर भर दिला आहे.


बॅले, पीके शिकला : आमिर खानने चित्रपटातील भूमिकेसाठी बॅले नृत्याचे प्रशिक्षण घेतले. एरोबिक्स व पार्करचे प्रशिक्षणदेखील त्याने घेतले आहे. पार्कर (पीके) हे अडथळे पार करण्यासाठी फ्रेंच लष्कराला दिलेले जाणारे विशेष प्रशिक्षण आहे. परिस्थितीनुसार शरीराच्या हालचाली करताना वेग आणि क्षमतेवर नियंत्रण ठेवण्याचे त्यात शिकवले जाते.


‘सत्याग्रह’ चे 50 कोटी
प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 50 कोटींचा पल्ला गाठला आहे. केवळ सहा दिवसांतील कमाईचा हा आकडा आहे. देशातील समाजाच्या स्थितीवर आधारित या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादावर आपण समाधानी असल्याची प्रतिक्रिया झा यांनी दिली आहे.