आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शायनी आहुजाचे ‘वेलकम बॅक’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुधीर मिश्राचा 2005 मधील पुरस्कारप्राप्त ‘हजारों ख्याहिशें ऐसी’द्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार्‍या शायनी आहुजाने त्यानंतर ‘वो लम्हे’ आणि ‘लाइफ इन अ मेट्रो’ यासारखे मुख्य प्रवाहातील चित्रपट केले. मात्र, जेव्हा जून 2009 मध्ये त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला त्यानंतर त्याच्या समोरील अडचणी वाढल्या. नुकताच तो चित्रपटामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, अनीस बज्मीच्या ‘वेलकम बॅक’ चित्रपटात तो दिसणार असल्याचे कळते. हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम’चा सिक्वेल आहे.
दिग्दर्शक अनीसने सांगितले की, ‘शायनी हा चित्रपट करत असून त्याची यात प्रमुख भूमिका आहे. शिवाय ही भूमिका त्याने यापूर्वी साकारलेली नाही. मला वाटते की, या भूमिकेसाठी अगदी योग्य आहे. चित्रपटाचे शेड्युल 40 दिवसांचे आहे. यामध्ये शायनी एक श्रीमंत माणूस बनला असून त्याच्या संपूर्ण शरीरावर टॅटू असतील.’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे.
पुनरागमनाविषयी काय म्हणाला शायनी, जाणून घ्या पुढील स्लाईडमध्ये...