आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • West Bemgal Chief Minister Mamata Banerjee At Rituparno Ghosh Funeral

ऋतुपर्णो घोष यांच्यावर कोलकत्यात अंत्यसंस्कार, बॉलिवूडमधून कुणीच पोहोचले नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांचे 30 मेच्या सकाळी हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले. कोलकत्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
31 मे रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. शिवाय कोलकत्यामधील अनेक दिग्गज व्यक्ती आणि बंगाली सिनेसृष्टीतील कलाकारही यावेळी हजर होते.
ऋतुपर्णो घोष यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली देणा-या बॉलिवूड कलाकारांपैकी कुणीही त्यांच्या अखेरचा निरोप देण्यासाठी आले नव्हते.
चोखेरबाली, रेनकोट, अबोहोमन या सिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे घोष यांची ख्याती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होती. तब्बल बारा वेळा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त करणारे ते दिग्दर्शक होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा ऋतुपर्णो घोष यांच्या अंत्यसंस्काराची छायाचित्रे...