आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FASHION DISASTER: अरेरे... सुश्मिताच्या ड्रेसिंग सेन्स हे झाले तरी काय ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसीम अकरमबरोबर लग्नाच्या अफवांमुळे सध्या सुश्मिता सेन लाईमलाईटमध्ये आली आहे. सुश्मिताच्या लग्नाची बातमी माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्यानंतर सुश्मिता पहिल्यांदाच एका कार्यक्रमात दिसली. अलीकडेच अभिनेता ऋतिक रोशनची मेव्हणी फराह अली खानने ज्वेलरी स्टोअर लाँच केले. या स्टोअर लाँचिंग पार्टीला बी टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींबरोबर सुश्मिता सेननेही हजेरी लावली होती.
कार्यक्रमात सुश्मिता जरा विचित्र पेहरावात दिसली. यावेळी सुश्मिताकडे बघून तिच्या ड्रेसिंग सेन्सला काय झाले, असा प्रश्न नक्कीच तिच्या चाहत्यांना पडला असेल.
सुश्मिता या कार्यक्रमात ऑरेंज कलरचा ड्रेस परिधान करुन आली होती. सुश्मिताच्या ड्रेसला ड्रेप्ड ड्रेसही म्हटले जाऊ शकत नव्हते किंवा जंप सुटच्या कॅटेगरीतलाही तिचा ड्रेस नव्हता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सुश्मिताचे फॅशन डिजास्टर...