आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखला अश्रु झाले अनावर, जेव्हा व्हिल चेअरवरून उतरून भेटायला आली चाहती!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड किंग शाहरुख खानचे जगभरात लाखो चाहते आहेत. परंतु सर्वच चाहते त्याला भेटू शकतात असे नाही. अलीकडेच, त्याची एक चाहती त्याला भेटली होती. बादशाह खान तिच्या दृढ निश्चयाकडे बघून भावूक झाला. शाहरुखला त्याची ही चाहती एम्स्टर्डममध्ये भेटली. त्याच्या या चाहतीचे नाव वेदा अयूबी आहे.
शाहरुखच्या जवळच्या सुत्राने सांगितले, की 'हॅप्पी न्यू इअर'च्या सेटवर शाहरुखची वेदा अयूबी नावाची चाहती त्याला भेटण्यासाठी आली होती. वेदाने आपल्या आई सांगितले होते, की ती जेव्हा कधी तिचा प्रेरणास्थान शाहरुख खानला भेटेल तेव्हा ती व्हील चेअरवरून उतरून त्याला स्वत:च्या पायावर भेटायला जाईल.
वेदा व्हिल चेअरशिवाय चालू शकत नाही. परंतु तीन दिवसांपूर्वी जेव्हा ती शाहरुखला भेटली तेव्हा 5-6 पाऊल चालून ती त्याच्या जवळ पोहोचली. सुत्राच्या म्हण्यानुसार, की एक सुपरस्टार होण्याच्या नात्याने त्याला माहित आहे, की त्याचे कितीतरी चाहते आहेत. परंतु त्याच्या या चाहतीच्या दृढ निश्चयाने तो भावूक केले.
वेदा सेटवर तिच्या व्हिल चेअरशिवाय चालत होती तेव्हा तो क्षण सर्वांसाठी खरंच भावूक करणारा होता. यावेळी शाहरुख खानच्या डोळ्यातून चक्क अश्रु वाहायला लागले होते. विशेष म्हणजे, शाहरुखच्या पुढील सिनेमाचे नाव 'फॅन' असून तो त्याच स्वत: एका चाहत्याची भूमिका साकारणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा वेदा अयबीसोबत शाहरुखचे छायाचित्र...