आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wedding Pics: बघा किती धुमधडाक्यात झाले होते अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने आज वयाच्या 38 व्या वर्षात पदार्पण केले आहे. अभिषेकला वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या मित्र आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या खास निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला अभिषेकच्या खासगी आयुष्याविषयी सांगत आहे. माजी जगतसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासोबत लग्न हा अभिषेकच्या जीवनातील सर्वात सुंदर क्षण होते. लग्नात अभिषेक खूप हँडसम दिसत होता.
खरं तर स्टार्स आपल्या लव्ह स्टोरीज जगापासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अभिषेक आणि ऐश्वर्याची लव्ह स्टोरी सुरुवातीपासूनच लाइमलाइटमध्ये राहिली. कारण हे दोघेही फिल्म इंडस्ट्रीतील मोठे स्टार्स आहेत. खरं तर अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात सूत जुळण्यापूर्वी दोघांचेही दुस-या सेलेब्ससोबत अफेअर होते. ऐश्वर्याचे नाव सलमान खान आणि विवेक ओबरॉय यांच्यासोबत जोडले गेले होते. तर राणी मुखर्जी आणि करिश्मा कपूरसह अभिषेकचे अफेअर होते.
बॉलिवूडच्या या स्टार जोडींचे अर्थातच अभिषेक आणि ऐश्वर्याचे कधी लग्न होईल, याचा विचारही कुणी केला नव्हता. सस्पेन्स, रोमान्स, ड्रामा... अभिषेक-ऐश्वर्याच्या लव्ह स्टोरीत सर्वकाही होते.
कुछ ना कहो, सरकार राज, गुरु, उमराव जान, ढाई अक्षर प्रेम के या सिनेमांमध्ये हे दोघे एकत्र झळकले. खरं तर खासगील आयुष्यात या दोघांना एकत्र आणण्याचे श्रेय सिनेमांनाच जातं. अनेक जण सांगतात की, बंटी और बबली सिनेमातील कजरारे कजरारे या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांचे सुत जुळले. नंतर 'गुरु' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांनी आपल्या प्रेमसंबंधांवर शिक्कामोर्तब केले. टोरंटोमध्ये गुरु सिनेमाच्या प्रीमिअरवेळी अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते.
प्रीमिअरहून मुंबईला परतल्यानतंर अमिताभ बच्चन यांच्या राहत्या घरी 14 जानेवारी रोजी या दोघांचा साखरपूडा झाला होता. या दोघांच्या हायप्रोफाईल रिलेशनशिपवर सगळ्यांच्या नजरा खिळून होत्या. बच्चन फॅमिलीने अभि-ऐशचा लग्नसोहळा हा खासगी सोहळा ठेवला होता. 20 एप्रिल 2007 रोजी हे लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले.
आज अभिषेकच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्याच्या लग्नाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा कसे धुमधडाक्यात झाले होते अभि-ऐशचे लग्न...