आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ रियाच नव्हे, बी टाऊनच्या या अभिनेत्रीसुद्धा रिअल लाईफमध्येही गेल्या छेडछाडीला सामोरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छेडछाडीच्या घटनेमुळे बॉलिवूड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एमटीव्हीची माजी व्हिडियो जॉकी आणि गेल्या वर्षी यशराजच्या ‘मेरे डॅड की मारुती’मध्ये काम केलेली रिया चक्रवर्ती मंगळवारी म्हणजे होळीच्या दिवशी छेडछाडीची शिकार बनली. तिने आपल्या ट्विटरवर या घटनेची माहिती दिली. तिने लिहिले की, ‘माझी काही वेळापूर्वी एका अज्ञात व्यक्तीने छेड काढली. तो माणूस दिसायला सभ्य वाटत होता. तो भरदुपारी माझ्या इमारतीच्या दोन वॉचमनच्या समोरून चालत आला.’
तसं पाहता बॉलिवूड अभिनेत्रींसोबत छेडछाडीची ही पहिली घटना नाहीये. अनेक अभिनेत्रींबरोबर अशा घटना घडल्या आहेत. चाहत्यांच्या गर्दीत अडकल्यानंतर या अभिनेत्रींना अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागते. अनेकदा गर्दीचा फायदा घेत काही लोक अभिनेत्रींच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताता. अशा घटनांमुळे अभिनेत्रींवर लाजिरवाणे होण्याची वेळ येते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कोणकोणत्या अभिनेत्रींबरोबर अशा प्रकारच्या घटना घडल्या...