आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेता जाएद खानच्या वेडिंग रिसेप्शनची खास छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे आठ वर्षांपूर्वीची असून यामध्ये तुम्हाला तुमच्या फेव्हरेट स्टार्सची त्याकाळची झलक बघायला मिळणार आहे.
नोव्हेंबर 2005 मध्ये जाएदचे लग्न त्याची बालमैत्रिण मलायका पारेखबरोबर झाले होते. वयाच्या 25 व्या वर्षी जाएद मलायकाबरोबर लग्नगाठीत अडकला होता. या दोघांचे लग्न बॉलिवूडमधील मोठ्या इवेंटपैकी एक होते. या दोघांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी या पार्टीत जमली होती.
या रिसेप्शन पार्टीत एक हटके कॉम्बिनेशन बघायला मिळाले होते. या पार्टीत सलमान खान, ऐश्वर्या राय आणि संगीता बिजलानी हे तिघे चक्क एका ठिकाणी जमले होते.
या पार्टीत ऐश्वर्या तिची आई वृंदा रायबरोबर पोहोचली होती. यावेळी ऐश्वर्या ब्लॅक साडीत दिसली होती. तर संगीता बिजलानी कलरफूल साडीत आणि सलमान खान ब्लू शर्ट-डेनिममध्ये दिसला होता.
ही सर्व छायाचित्रे आठ वर्षे जुनी असून तुम्ही यामध्ये तुमच्या आवडत्या स्टार्सचे आठ वर्षांपूर्वीचे रुप बघू शकता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा सेलिब्रिटींचे आठ वर्षांपूर्वीचे आणि आत्ताचे रुप...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.