आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When I Saw Bigg Boss, I Wanted To Slap Everybody Silly: Tanuja

तनुजा म्हणाल्या, \'बिग बॉस बघून सर्व स्पर्धकांना थोबाडीत मारायची झाली होती इच्छा\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलर्स वाहिनीवर प्रसारित होणारा 'बिग बॉस' हा शो नेहमीच वादात राहिला आहे. या शोचे आत्तापर्यंत सात पर्व प्रसारित झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच सातव्या पर्वाचा ग्रॅण्ड फिनाले पार पडला आणि त्यात बाजी मारली ती गौहर खानने. शोच्या पहिल्या पर्वापासून ते सातव्या पर्वापर्यंत सर्वच स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चा एकवटून शोचा टीआरपी वाढवताना दिसले.
या शोच्या सातव्या पर्वाबद्दल बोलायचे झाल्यास गौहर आणि कुशालसह तनिषा मुखर्जी आणि अरमान कोहली यांच्या रोमान्सची चर्चा सर्वांच्याच ओठांवर होती.
तनिषाच्या नावाची अशापद्धतीने चर्चा झाल्याने तिची आई आणि अभिनेत्री तनुजा आपल्या मुलीवर चांगल्याच नाराज झाल्याची बातमी होती. बिग बॉसच्या घरात तनिषा आणि अरमान यांच्यातील जवळीक बघून तनुजा यांचा राग अनावर झाला होता, असेही ऐकिवात आहे.
मात्र शोदरम्यान तनिषाविषयी ज्या अफवा पसरल्या होत्या, त्याविषयी आता तनुजा यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे शो संपल्यानंतर ब-याच दिवसांनी तनुजा बिग बॉसविषयी बोलल्या आहेत.
तनिषाविषयी काय म्हणाल्या तनुजा, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...