आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • When Neetu And Rishi Kapoor's Daughter Got Married

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नीतू-ऋषीच्या मुलीच्या लग्नात जमली होती स्टार्सची मांदियाळी, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नानंतर फिल्मी दुनियेला रामराम ठोकण्याचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून बघायला मिळतोय. तसं पाहता काही अभिनेत्री याला अपवादसुद्धा आहेत. मात्र कपूर घराण्याची सून आणि ऋषी कपूरची पत्नी नीतू सिंगने आपल्या कुटुंबाला प्राथमिकता देत लग्नानंतर सिनेसृष्टीला रामराम ठोकला होता.

लग्नानंतर नीतूने आपल्या मुलांच्या संगोपनातत स्वतःला गुंतवून घेतले. नीतू आणि ऋषीला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा रणबीर बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र त्यांची मुलगी रिद्धिमा कधीच लाईमलाईटमध्ये आली नाही. पण पडद्यामागे ती ग्लॅमर वर्ल्डशी जुळलेली आहे. 33 वर्षीय रिद्धिमा बिझनेसवुमन आणि फॅशन डिझायनर आहे. 2006 साली ती लग्नगाठीत अडकली होती. त्यावेळी रणबीरने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेली नव्हती. मात्र तिच्या लग्नात बी टाऊनच्या अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

आपल्या दोन्ही मुलांना सेटल केल्यानंतर नीतू यांनी आता बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं आहे. काही जाहिरातींमध्ये झळकल्यानंतर नीतू 'दो दुनी चार' या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकल्या. 'लव्ह आज कल' या सिनेमात त्यांनी कॅमिओ केले. आता मुलगा रणबीर आणि पती ऋषी कपूरबरोबर त्या लवकरच 'बेशरम' या सिनेमात झळकणार आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा मुलीच्या लग्नातील नीतूच्या चेह-यावरील आनंद आणि कोणकोणत्या सेलिब्रिटींनी या लग्नाला हजेरी लावली होती...