आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • When Salman Khan And Katrina Kaif Were In Relationship

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या छायाचित्रांमुळे झाली होती सलमान-कतरिनाच्या अफेअरची पोलखोल !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कतरिना कैफ सध्या रणबीर कपूरबरोबरच्या अफेअरमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी कतरिनाला रणबीर कपूरसोबत स्पेनच्या इबिजा बीचवर बिकिनीत सुटीची मजा घेताना बघितले गेले.

भारतातील एका नियतकालिकाने त्यांची छायाचित्रे छापली. यानंतर सर्वांनीच ही छायाचित्रे प्रकाशित केली. त्यामुळे बरीच खळबळ उडाली. या छायाचित्रांमध्ये कतरिना बिकिनीत शर्टलेस रणबीरबरोबर समुद्रकिना-यावर उभी दिसत आहे.

मात्र रणबीरबरोबर प्रेमाचे धडे गिरवणारी कतरिना यापूर्वी सलमान खानच्या प्रेमात आकंठ बुडाली होती, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.

दोघांच्या रिलेशनशिपची एकेकाळी बरीच चर्चा झाली होती. कतरिना प्रत्येक ठिकाणी सलमान खानबरोबर दिसायची आणि दोघांमध्ये असलेली जवळीक छायाचित्रांच्या माध्यमातून नेहमीच बघायला मिळाली. मात्र या दोघांचे काही वर्षांतच ब्रेकअप झाले.

आज आम्ही तुम्हाला कतरिना आणि सलमानच्या अफेअरची पोलखोल करणारी काही खास छायाचित्रे दाखवत आहोत...