आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे थाटामाटात झाले होते युक्ता मुखीचे लग्न, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मिस वर्ल्‍ड युक्ता मुखीने पती आणि सासरच्‍या मंडळीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. हुंड्यासाठी नव-याने मारहाण केल्‍याचा आरोप युक्ताने या तक्रारीत केला आहे. तसेच पतीने अनैसर्गिक शारीरीक संबंध ठेवल्‍याचाही आरोप तिने केला आहे.

युक्ता मुखीचा पती प्रिन्‍स तुली आणि त्‍याच्‍या आईवडलांविरुद्ध युक्ता मुखीने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्‍यात तिने म्‍हटले आहे, की सासू-सासरे आणि नव-याकडून हुंड्यासाठी माझा छळ करण्‍यात येत होता. पैशासाठी पतीने मारहाण केल्‍याचे तिने तक्रारीत म्‍हटले आहे.

युक्ता मुखीचा विवाह नागपुरचे प्रसिद्ध हॉटेल व्‍यावसायिक प्रिन्‍स तुली यांच्‍याशी 2 नोव्‍हेंबर 2008 ला झाला होता. लग्‍नानंतर ती नागपुरातच स्‍थायिक झाली होती. परंतु, गेल्‍यावर्षी दोघांमध्‍ये तणाव निर्माण झाला झाला होता. त्‍यानंतर सप्‍टेंबर 2012 मध्‍ये तिने सासरच्‍याविरुद्ध तक्रार दाखल केली. युक्ताला मुंबईत परतायचे होते. नागपुरात ती रमली नाही. कदाचित यामुळेच दोघांमध्‍ये दुरावा निर्माण झाला असावा, असे काही निकटवर्तीयांनी सांगितले.
युक्ता आणि प्रिन्सला एक मुलगा आहे. तुली एक मोठे व्यावसायिक घराणे आहे. या घराण्याचे अनेक हॉटेल्स, मॉल्स आणि कॉलेजेस आहेत.

पुढे छायाचित्रांमध्ये बघा कसे थाटात झाले होते युक्ता आणि प्रिन्सचे लग्न...