आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रानची स्माइल गेली कुठे?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिरियल किसर इम्रान हाशमी चित्रीकरणाच्या सेटवर सहकलाकारांसोबत जास्त हसत-बोलत नाही. याचा खुलासा त्याची सहकलाकार विद्या बालनने नुकताच केला आहे. विद्या बालन आणि इम्रान हाशमी विजोड जोडप्याची कथा असलेल्या 'घनचक्कर' चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत. विद्या म्हणाली की, 'छोटासा विनोद झाल्यावरही मी हसणे रोखू शकत नाही, पण इम्रानसमोर संपूर्ण कॉमेडी शो सुरू असला तरी त्याला हसू येत नाही.' दरम्यान, यावर इम्रानने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. कॉमेडी आणि थ्रिलर असलेला हा घनचक्कर राजकुमार गुप्ता यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपट 28 जूनला प्रदर्शित होत आहे. कदाचित इम्रानला चित्रपटाची चिंता होत असावी.