आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कुणासोबत जुळले सोनमचे सुत?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सध्या स्टाइलिस्ट अभिनेत्री सोनम कपूरच्या अफवा चालू आहे. ऐकिवात आहे, की सोनम उद्योगपती साहिर बेरीसोबत डेटिंग करत आहे. साहिर उद्योगपती आणि मॉडेलसुध्दा आहे. तो दिल्लीव्यतिरिक्त लंडन आणि गोव्यालाही राहतो. तसेच तो बीच क्लब परॅयाचा मालक आहे.
एका मुख्य वर्तमानपत्रानुसार, 'सोनम सध्या उद्योगपती साहिर बेरीसोबत एका हॉटेलमधून बाहेर पडताना दिसली होती. त्यानंतर त्यांच्या डेटच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु सोनम या गोष्टीला स्पष्ट नकार देत आहे.'
या वर्मानपत्राने अहवालात लिहिले होते, की सोनम आणि साहिरची ओळख सोशल मिडियाच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. असेही सांगितले जाते, की रियाने तिची बहीण सोनमला सहिरपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली आहे.
साहिर यूएसचा असून त्याने तिथून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या तो लंडनमधून इंटरनॅशनल बिझनेसचे शिक्षण घेत आहे. त्याचे कुटुंबीयसुध्दा लंडनलाच राहतात. त्याने लंडनमध्ये काही दिवस घालवले आणि नंतर मॉडेलिंगसाठी गोव्याला आला.