आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणकार म्हणतात कॅटरीनांच \'नंबर वन\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘धूम-3’ चित्रपटाचे ऐतिहासिक यश आणि इतर चित्रपटामुळे कॅटरिना कैफ पुन्हा नंबर वनच्या सिंहासनावर जाऊन बसली आहे. ज्यावर दीपिका पदुकोनने कब्जा केला होता. असे चित्रपट इंडस्ट्रीच्या जाणकरांचे मत आहे.

गेल्या वर्षी कॅटरिनाचा एकही चित्रपट आला नव्हता. तिच्या गैरहजेरीत दीपिका पदुकोनने तीन सुपरहिट चित्रपट दिले. ‘ये जवानी है दीवानी’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘गोलियों की रासलीला-रामलीला’ या चित्रपटाद्वारे तिने नंबर वनच्या हीरोइनचे सिंहासन मिळवले होते. मात्र, ‘धूम 3’ चित्रपटाच्या यशाने समीकरण पुन्हा पहिल्यासारखे झाले आहे. हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वात सुपरहिट चित्रपट ठरणार आहे. त्यामुळे या उद्योगाच्या तज्ज्ञांच्या मते, इंडस्ट्रीच्या आघाडीच्या अभिनेत्रीचा मुकुट कॅटरिनाने पुन्हा मिळवला आहे.

आमिर खानमुळे कॅटरिनाला चित्रपटात खूप काही करण्याचा वाव राहणार नाही अशी चर्चा समीक्षक करत होते. मात्र, तिचा विश्वास निर्माते आदित्य चोप्रावर होता. शेवटी धूमचे आतापर्यंतचे सर्व चित्रपट पाहता, कोणत्याही हीरोइनला इतकी स्पेस मिळाली नव्हती जितकी कॅटला मिळाली आहे. ‘धूम-2’मध्ये ऐश्वर्याचे काम प्रभावी होते, मात्र चित्रपट पूर्ण हृतिकने आपल्या नावावर केला होता. दुसरीकडे या मालिकेचा तिसरा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहात येत आहेत. त्यामुळे कॅटच्या कामाचीदेखील प्रशंसा होत आहे.

उत्तर भारतातील एका वितरकाच्या मते, कॅटरिनाच्या सुरुवातीच्या गाण्यावर खूप प्रतिक्रिया येत आहेत. यशराज बॅनरने हे गाणे टीव्हीवर न दाखवून हुशारीचे काम केले आहे. ट्रेड विश्लेषक तरण आदर्श म्हणतात की, तिने दमदार पुनरागमन केले आहे. कोणत्याही स्टारची लोकप्रियता वाढण्यात फक्त एका हिटची गरज असते. धूम-3 तर सुपर डुपर हिट ठरला आहे. आमिर आणि धूम-3 मालिकेऐवजी कॅटरिनामुळेदेखील लोक चित्रपट पाहायला जात आहेत. म्हणजेच आजदेखील तिची क्रेझ कायम आहे. एका मोठय़ा प्रदर्शर्काच्या मते, दीपिका किंवा कोणत्याही दुसर्‍या अभिनेत्रीला 2013 सारखे वर्ष पुन्हा पाहायला मिळणार नाही. 2014 मध्ये नंबर वन राहण्यासाठी तारकांमध्ये पुन्हा स्पर्धा दिसून येईल.

वर्षाच्या शेवटी का होईना कॅटरिना एक क्रमांकावर आली आहे. पुढच्या वर्षी तिचा हृतिक रोशनसोबत ‘बँग बँग’ आणि सैफ अली खानसोबत कबीर खानचा ‘फँटम’ येत आहे.


300 कोटींची एकमेव हीरोइन
कोमल नाहटा - कॅटरिनाचा एकही चित्रपट यावर्षी आला नव्हता. तरीसुद्धा ती नंबर वनच्या र्शेणीत होती. ‘धूम-3’ 300 कोटी रुपयांची कमाई करू शकतो. त्यामुळे ती 300 कोटी रुपयांच्या चित्रपटाची एकमेव हीरोइन होणार आहे.

तिने दमदार पुनरागमन केले
तरण आदर्श- धूम-3 मध्ये आपल्या परफॉर्मन्स आणि लूकसाठी कॅटची प्रशंसा होत आहे. गेल्यावर्षी तिचा चित्रपट आला नव्हता, मात्र तिने दमदार पुरागमन केले आहे. चित्रपट सुपरहिट होण्यात आमिरबरोबर तिचेहे मोठे योगदान आहे.