आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Would Bag Jism 3, Sunny Leone Or Sharlyne Chopra

'जिस्म 3'मध्ये कोण, सनी लियोन की शर्लिन चोप्रा ?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जसजशी 'जिस्म 2'ची रिलीज डेट जवळ येत आहे, तसतशी या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता वाढू लागली आहे. आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढेल अशी बातमी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बातमी असी आहे की, पूजा भट्ट जिस्मचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याच्या तयारीला लागली आहे. 'जिस्म 3' हा थ्री डी सिनेमा असणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'जिस्म 3' मध्ये सनी लियोन किंवा प्लेबॉय मॅग्झिनसाठी न्यूड फोटोशूट करणा-या सेक्सी शर्लिन चोप्राची लीड रोलमध्ये वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे.
भट्ट कॅम्पच्या सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'जिस्म २' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळताच 'जिस्म 3'ची तयारी सुरु करण्यात येणार आहे. आता या चित्रपटात सनीच दिसणार का असा प्रश्न विचारल्यावर, अद्याप सनीच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नसल्याचे सुत्राने सांगितले. पण शर्लिनच्या नावाचा विचारही सुरु असल्याचे या सुत्राने सांगितले. चित्रपटासाठी कलाकार आणि दिग्दर्शकाची निवडप्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. महेश भट्ट यांनी 'जिस्म 3'ची पटकथा लिहायला सुरुवात केली आहे. आता पाहुया 'जिस्म 3' कुणाच्या पदरात पडणार ते.
महापौरांचे बेस्ट बसेसवरुन 'जिस्म २'चे उत्तेजक पोस्टर काढण्याचे ऑर्डर
चित्रपटाच्या घोषणेपासून ते रिलीजपर्यंत 'जिस्म-2' वादातच!
PHOTOS : 'जिस्म २'च्या पडद्यामागच्या या दहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का ?
'जिस्म २'च्या या अभिनेत्रीवरुन अखेर 'पडदा' हटवला !