आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

49 वर्षीय गोविंदाला का करावा लागला आपल्या पत्नीसोबत पुनर्विवाह? जाणून घ्या यामागचे रंजक कारण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोविंदा बॉलिवूडचा असा अभिनेता आहे, जो जेव्हाही रुपेरी पडद्यावर येतो तेव्हा प्रेक्षकांना हसवल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच गोविंदाची फॅनफॉलोईंग खूप आहे. गोविंदाने रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याचे दर्शन प्रेक्षकांना घडले नाही. त्यामुळे सिनेमांच्या माध्यमातून तो सध्या चर्चेत नाहीये. मात्र आपल्या खासगी आयुष्यामुळे तो चर्चेत आला आहे.
झालं असं, की गोविंदाने 14 जानेवारीला त्याची पत्नी सुनीतासोबत पुनर्विवाह केला होता. या लग्नामागे त्याची दिवगंत आई नजीमा यांची इच्छा सामील असल्याचे सांगितले जात आहे. गोविंदाच्या आईची इच्छा होती, की त्याने वयाची 49 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याची पत्नी सुनीतासोबत पुन्हा लग्न करावे.
गोविंदाने भास्कर ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, 'मी वयाची 49 वर्षे पूर्ण केल्यानंतर माझ्या पत्नीशी पुनर्विवाह करावा, अशी माझ्या आईची इच्छा होती. म्हणून लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाल्यावर मी विधीवत पुनर्विवाह केला. 1987मध्ये मी सुनीतासोबत गंधर्व विवाह केला होता. म्हणून मी यावर्षी जानेवारीत सर्व विधीनुसार पुन्हा लग्न केले आहे.'
गोविंदाने हसत सांगितले, 'मी आणि सुनीताने 1987मध्ये एका साध्या समारंभात लग्न केले होते. परंतु यावेळी आम्ही थाटात लग्न केले.'
गोविंदाने त्याच्या पुनर्विवाहाविषयी काय सांगितले? जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...