आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्मान गिरवतोय मराठीचे धडे, जाणून घ्या का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना चंदीगड येथील एका पंजाबी कुटुंबातील असून तो चांगला गायकसुद्धा आहे. आता आपल्या आगामी सिनेमासाठी तो चक्क मराठीचे धडे गिरवतोय. आगामी 'बंबई फेयरीटेल' या सिनेमासाठी तो मराठी शिकतोय. 19व्या शतकातील महाराष्ट्रीयन वैज्ञानिक बापूजी तळपदे यांची व्यक्तिरेखा आयुष्मान या सिनेमात साकारणार आहे. विभू पुरी हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत.
आपल्या भूमिकेत जीव ओतण्यासाठी आयुष्मान मराठी भाषा शिकतोय. याविषयी तो म्हणतो, की ही एक वेगळी भाषा आहे. मी माझ्या प्रत्येक भूमिकेसाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतो. या सिनेमात मला गतकाळातील एक व्यक्तिरेखा साकारायची आहे. त्यासाठी मी त्या व्यक्तिरेखीची भाषा बोलणे शिकतोय.
आयुष्मानने पुढे सांगितले, की जेव्हा मी पहिल्यांदा चंदीगडहून मुंबईला आलो होतो, तेव्हा स्टेशनवर उतरल्यानंतर मी सर्वप्रथम एक पुस्तक खरेदी केले होते, त्याचे नाव होते 'मराठी भाषा कशी बोलावी'. त्यानंतर हळूहळू मी मराठी भाषा समजू लागलो, मात्र अद्याप बोलू शकत नाहीये. जेव्हा मला या सिनेमाची ऑफर मिळाली, तेव्हा मी माझ्या स्टाफची मदत घेतली. ते मला मराठी शिकवत आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या सध्या काय करतोय आयुष्मान...