आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Does Amitabh Bachchan\'s Mini Cooper Have 2882 Number

\'ती\' कार आराध्याची नव्हे अमिताभ बच्चन यांचीच...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेल्या मिनीकॉपर गाडीबाबत बीग बी यांनी नवी माहिती दिली आहे.
अमिताभ यांची नात आराध्याला पहिल्या वाढदिवसी बच्चन परिवाराने मिनीकॉपर गाडी भेट दिल्याचे माध्यमांत बातम्या आल्यानंतर बीग बींनी स्वत:च खुलासा केला आहे. याबाबत बच्चन यांनी फेसबुकवर दोन पोस्ट टाकल्या असून, ती कार माझीच असून माझ्या वाढदिवशी मला अभिषेकने गिफ्ट दिली असल्याचे सांगितले आहे.
अभिषेकने आराध्याला कार भेट दिली या बातम्या चुकीच्या असून, अभिषेकने माझ्या वाढदिवशी मला भेट दिली असल्याचे स्पष्टीकरण फेसबुकवर दिले आहे. याबाबत पुरावा देताना अथवा सांगताना त्यांनी म्हटले आहे की, या कारचा नंबर 2882 असा आहे. याच दिवशी (2-8-82) माझा कुली चित्रपट करीत असताना अपघात झाला होता. त्या दिवशी माझा पुर्नजन्मच झाला होता. तेव्हापासून आम्ही तो माझा दुसरा वाढदिवस साजरा करतो, असे सांगत त्या कारचा क्रमांक हा माझ्या अपघाताच्या दिनांकावरुन घेतला असल्याचे बीग बीने स्पष्ट केले.
अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्याला तिच्या पहिल्या वाढदिवशी (16 नोव्हेंबर 2012) कार भेट दिल्याची बातम्या वृत्तमानपत्रात आल्या होत्या. मात्र ती कार माझीच आहे,माझ्या वाढदिवसानिमित्त ती मोटारी खरेदी केली आहे. त्या मोटारीवर माझे प्रेम असून, गाडीचा क्रमांक MH 02 cv 2882 असा आहे. 2882 हा क्रमांक माझ्या आयुष्यातील विशेष आहे. या तारखेचे महत्त्व म्हणजे हा माझा दुसरा वाढदिवसच आहे. कुली चित्रपटाच्या वेळी 2 ऑगस्ट 1982 रोजी मला अपघात झाला होता. अपघाताची तारीख म्हणजेच भेट दिलेल्या कारचा 2882 नंबर आहे असे अमिताभ यांनी फेसबुकवर म्हटले आहे.