आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WIKILEAKS : बॉलिवूड सिनेमांवर लागतो अंडरवर्ल्ड आणि राजकारण्यांचा पैसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील गोपनीय तसेच गुप्त बातम्या प्रसिद्ध करणारी एक वादग्रस्त वेबसाइट 'विकिलीक्‍स'ने देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत एक खुलासा प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली आहे. 'विकि‍लीक्स'ने दावा केला आहे की, राजीव गांधी हे स्‍वीडनमधील एका कंपनीसाठी एजंट म्हणून काम करत होते. विकिलीक्‍सने हेही प्रसिद्ध केले आहे की, 70 च्या दशकात भारताला लढावू विमान विक्री करण्‍याचा 'साब स्कानिया' कंपनीचा हेतू होता. परंतु तो साध्य होऊ शकला नाही.

'विकिलीक्‍स'ने सन 1974 ते 1976 दरम्यान अनेक गुप्त माहित उघड केली आहे. त्यापैकी 21 ऑक्टोबर 1975च्या एका संदेशात राजीव गांधी हे स्वीडिश कंपनीचे एजेंट असल्याचा उल्लेख आहे.

तसे पाहता विकिलीक्सने यापूर्वीही अशाप्रकारचा खळबळजनक खुलासे केले आहेत. विकिलीक्सने बॉलिवूडशी संबंधितसुद्धा अनेक खुलासे केले होते.
एक नजर टाकुया विकिलीक्सने बॉलिवूडसंबंधी कोणते खुलासे केले यावर....