आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wills Lifestyle India Fashion Week: Sonam Kapoor Sports Ethnic Look

WLFWच्या ग्रँड फिनालेला सोनमने लावले चारचाँद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'विल्स लाईफस्टाईल फॅशन वीक'च्या शेवटच्या दिवशी अभिनेत्री सोनम कपूरने चारचाँद लावले. सोनमने या फॅशन वीकमध्ये फक्त रॅम्प वॉकच केला नाही तर प्रेक्षकांच्या समोरच्या रांगेत बसून डिझायनर मनिष अरोडाला चिअरअपसुद्धा केले.

सोनम सध्या आपल्या आगामी 'रांझना' या सिनेमाच्या शुटिंगच्या निमित्ताने दिल्लीत आहे. शुटिंगमधून वेळात वेळ काढून ती मनिषचा शो बघायला येथे पोहोचली होती.

पाच दिवस चाललेल्या या फॅशन शोमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, गुल पनाग, जॅकलिन फर्नांडिस, ईशा गुप्ता या कलाकारांनी रॅम्पवर आपला जलवा दाखवला. तर ग्रँड फिनालेची शोभा सोनमने वाढवली.

पाहा विल्स फॅशन विकच्या शेवटच्या दिवशीची खास क्षणचित्रे...