आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेत्यांच्या विरोधाचा सामना करत पूर्ण झाला 'यमला पगला दिवाना 2'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अ‍ॅक्शन आणि कॉमेडी धाटणीचा 'यमला पगला दिवाना 2' हा सिनेमा येत्या 7 जूनला सर्वत्र रिलीज होतोय. मात्र खूप सहजासहजी हा सिनेमा तयार झालेला नाहीये. एकेकाळी बीकानेरचे भाजपचे खासदार राहिलेले धर्मेंद्र यांना आपल्या या सिनेमासाठी काँग्रेस नेत्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. मध्य प्रदेशात या सिनेमाचे शूटिंग सुरु असताना स्थानिक काँग्रेस नेत्यांनी सिनेमाला अश्लील म्हणत त्याचा विरोध केला होता. मोठ्या अडचणीतून मार्ग काढत या सिनेमाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले होते.
हा सिनेमा आता रिलीजसाठी सज्ज असून येत्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. या सिनेमात धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओलबरोबर नेहा शर्मा, क्रिस्टिना अखीवा, जॉनी लिव्हर, अनुपम खेर, अन्नू कपूर, गुलशन ग्रोव्हरही झळकणार आहेत. सध्या देशभरात या सिनेमाचे जोरदार प्रमोशन केले जात आहे.
या सिनेमात सुखविंदर सिंग, शंकर महादेवन, मिका सिंग, श्रेया घोषाल, सोनू निगम, सुनिधी चौहान, शारिब-तोषी या गायकांनी गाणी गायली आहेत. तर शारिब साबरी आणि तोषी साबरी यांनी सिनेमातील गाणी संगीतबदध केली होती. सिनेमाचा पहिला भाग 2011 साली रिलीज झाला होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आणखी काही या सिनेमाविषयी...