आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yamla Pagla Deewana 2 Deol Brothers Begin Promotion Spree

धर्मेंद्र, सनी, बॉबी पुन्हा करणार धमाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल हे त्रिकूट परतणार आहे. म्हणजेच ‘यमला पगला दीवाना 2’ सोबत हे तिघे पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करताना दिसणार आहेत.

अलीकडेच संगीथ सिवान दिग्दर्शित चित्रपट ‘यमला पगला दीवाना 2’ चा ट्रेलर लाँच करण्यात आला. या चित्रपटात अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहे. क्रिस्टिना अखिवा नावाची नवी अभिनेत्री या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात सनीची पत्नी लिंडा आणि मुलगा वेगवेगळ्या रूपात दिसणार आहेत.

ट्रेलर लाँचिंगच्या वेळी धर्मेंद्रने सांगितले की, माझी सून लिंडाने चित्रपटाच्या कामात भरपूर सहकार्य केले आहे. सनी म्हणाला की, त्यांनी लेखन विभागास योगदान दिले आहे. ब्रिटनच्या मंदीवर कथानक असल्याचे त्याने सांगितले. सनीचा मुलगा करण चित्रपटाचे बारकावे शिकत आहे. त्याने सहायक दिग्दर्शकाच्या रूपात काम सुरू केले आहे. ट्रेलर लाँचवेळी चित्रपटातील स्टारकास्टसमवेत इतर कलाकारही उपस्थित होते. चित्रपटाचे ट्रेलर 29 मार्चपासून चित्रपटगृहात दाखवले जाईल. 7 जूनला हा चित्रपट रिलीज होणार आहे.